गुरुवार, २० एप्रिल, २०१७

आठवणीतले काजू





वार्षिक परीक्षा झाल्यावर ओढ लागते ती नयनरम्य व आल्हाददायक वातावरणात रमण्याची. ओढ असते ती निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, अर्थातच गावी जाण्याची. मे महिन्यात मुंबई ला उष्णतेची पातळी वाढू लागल्याकारणाने, गावी जाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. आई बरोबर आजोळी जाण्याची मज्जा काही एकदम उत्स्फुर्तदायकच! त्यामुळे कित्येक लहानपणींच्या आठवणींना उजाळा येत राहतो. गावच्या वातावरणात राहू लागल्यावर मुंबई सारखे सकाळी उठायला लागताना गजर देखील लावायची गरज नाही पडत, हे आहे मानवी जीवनाला लाभलेले निसर्गाचे वरदान. सकाळी उठल्यावर बागेत किंवा नदीवर... दरीदरीतून वाहणाऱ्या पाण्यात अंघोळ करून झाली कि भाकर-चटणी व भाजलेला उडिदाचा पापड खाण्याची मज्जा सुद्धा आनंददायक! आणी मुद्दामून हे खाद्य मी न्याहरीस खाणार, नाहीतर मला गावची मज्जा कशी अनुभवायला मिळणार? हे सुद्धा आहे ना इथे... नंतर मग दुपारच्या भोजनाच्या अगोदर नातेवाईकांशी भेटीगाठी व दुपारी झोपताना बाहेर नैसर्गिक हवा आल्यावर झाडांच्या सळसळत्या पानांचा आवाज आणि गार वारा मानसिक समाधानाचा स्पर्श करून जातो. झोपून उठल्यावर मामाबरोबर बागेत पाणी लावायला जाणे किंवा शेतात फेरफटका आणि चालताना वाटेत आकर्षित करणारे करवंद किंवा आंबे, हे तर शंभर टक्के काढण्यास मनाला प्रवृत्त करतात. हे सर्व करून आल्यावर, गायी-बैलांचे पाय मोकळे करावयास व त्यांना चरण्यासाठी मी मामाबरोबर लहान असताना जात असे आणी नंतर मग गावातल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला माझी सुरुवात. प्रदोषकाळी हातपाय धुवून झाल्यावर देवाला नमस्कार करून परत मग नंतर कॅरम किंवा बुद्धिबळ सारखे खेळ मी खेळत असे ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणी गावी काय जेवणाची वेळ संध्याकाळी ०८.०० वाजता, नंतर मग गावकरी मंडळी झोपी जात असत पण इथे मुंबईकरांना कसली झोप येते लवकर? मग त्या वेळेत मुंबईहून आलेल्या इतरांशी गप्पा गोष्टी मारण्यास सुद्धा, दिलखुलास आधार वाटू लागतो. असा माझा दैनंदिन दिनक्रम आजोळी असल्यावर होत होता.
सायंकाळी बागेतून परतत असताना आजीने मस्त अश्या काजूच्या बिया भाजायला ठेवलेल्या. पूर्वी आजी काजूच्या बिया भाजण्यासाठी शेतात जात असे, हे मला माहित होते आणि मी बघितले सुद्धा होते, पण अचानक घरा नजीकच्या एका ठिकाणी तिने काजूच्या बिया भाजायला सुरुवात केलेली, मी म्हटले आजी मी येऊ का मदतीला? आजीने मला तिथेच दम दिलेला कि लांब रहा ह्यापासून, उगाचच काजूसारखे द्रव्य ठिणगीसारखे लगेच उडाले तर... पण मी माझा हट्ट काय सोडला नाही आणि आजीचे वय सुद्धा झाले आहे. सोबत आठवण म्हणून एक-दोन छायाचित्रही टिपले. त्यानंतर भाजलेले काजू थंड झाल्यावर फोडताना आजीच्या हाताला जो काळपट रंग चढायचा, तो काय मग हप्ताभर पूर्णपणे जायायचा नाही. शेवटी काजुतले द्रव्य हे भाजल्यानंतर फोडतानाही लागतेच आणि ह्या गोष्टी साठी मदत करायला कोणी न सांगता, मी अगदी जायायचोच! महिनाभर काय सुट्टी घेतलेली असायची आणि माझे हात काळपट पडतील याची काय फिकीर नव्हती. त्यामुळे पूर्णतः गावकरी बनून राहणे मी पसंत करत असे, नाहीतर गावची मज्जा कशी लुटता येणार?

रानवाटेच्या फिरतीवर असताना मी आणि गावकरी बंधू खास काजू गोळा करण्यासाठी निघालेलो. त्याने मोठी टोपली पकडलेली, तर मी काटा पकडलेला. काटा म्हणजे उंच झाडावर असलेले काजू काढण्यासाठी तयार केलेले साधन, जे हलक्या बांबूला वर टोकावर ‘व्ही’ आकाराचे उलटे करून बांधत असत व ते घेऊन मी काजू काढावयास सुरुवात केली. खाली चार-पाच चादरींचाही पसारा केलेला, जेणेकरून त्यांना मार न लागता ते खाण्यास योग्य ठरेल. असे चालू असताना एक मात्र कोवळे काजू माझ्या कपाळावर वर बघता पडले व त्यातील द्रव्य माझ्या उजव्या डोळ्यात गेले. फार आणि बेफान माझे डोळे झोंबत राहिलेले. इतके ते झोंबलेले कि मसाला जाण्याहूनही अधिक. बाप रे! माझा सोबतीचा सुद्धा सावळागोंधळ झालेला कि आत्ता काय करावं? डोळ्यातून निघणाऱ्या पाण्यासोबत ते द्रव्य कमी झाले व झोंबायचेही, घरी जाऊन गप्पपणे झोपून गेलो कोणालाही न सांगता. संध्याकाळी उठल्यावर पहिले आरशात बघितले कि उजव्या डोळ्याने दिसतंय न बरोबर... काय अजून जास्त दुखापत तर झाली नाही ना... पण सुदैवाने तसे काही झाले नव्हते. तरीसुद्धा एक मात्र निश्चित झालेले, डोळ्याच्या सभोवताली द्रव्य पसरल्याने, काळपट पणाचा थर साचून राहिलेला, तो पण गेला काही दिवसांनी आणि घरच्यांचा ओरडा पडलेला ती एक वेगळी गोष्ट. पण ह्या प्रसंगातून डोळ्यासाठी सुदैवाने मात्र बचावलो.
काजूची भाजी खायायच्या अगोदर, नुसतेच कोवळे शिजवलेले काजू खायायची मज्जा एकदम झकासच!

--/ चंद्रशेखर सावंत

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

वाचनाच्या वळणावर...






करिअरशी कसरत करत असतानावेळात वेळ काढून केलेले वैचारिक पातळीवरचे योग्यतेचे निर्णय किंवा योग्यता घडवण्यास पात्र ठरणारे बदल, याची विद्वत्ता मला 'वाचनातूनआणि 'लेखनातूनचमिळत राहतेय.
मित्र आणि मैत्रिणींनोएक मात्र खरे... वाचनामुळे ज्ञानात भर पडते तर लिखाणामुळे शब्दरचना कळतातह्या माझ्या दैनंदिनी परिवर्तनामध्ये मी परिपक्व होत राहीन तितका कमीआयुष्यात चुका तर काय होतच राहतात आणि माणसाकडून चूक नाही होणार तर कोणाकडून होणार?  पण त्या सुधारायचा असतील तर योग्य विचारांसाठी योग्य विचारात्मक वाचन व अनुभव हाच उत्तम पर्याय असं मला तरी वाटतं... आणि हाच माझा वक्तशीर छंदतुम्हीही तुमचा योग्य छंद जोपासा कारण हाच छंद तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यास प्रवृत्त करतो व दिशा दाखवून देतो.
आयुष्याच्या वाटेवर जगताना योग्य परिवर्तन घडवणाऱ्या माणसाने योग्य छंद हा अवश्य बाळगावात्यातूनच त्याला नीर-निराळ्या प्रकारचे धडे मिळत राहतातवैफल्यग्रस्त स्थितीमध्ये तर स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण केल्यावर एक समंजस प्रवृत्तीनुसार एक वेगळाच मार्ग अर्थातच आत्मबल आपला वाढू लागतोयाचं मूळ कारण म्हणजे वाचनातून निर्मिती झालेली समंजस प्रवृत्तीची निर्माण होणारी पातळी.            
मोत्याचे मणी सारखेच नसतात, त्याचप्रमाणे बाह्यजगात वावरतानाही अगदी सर्वच काही योग्य विचारांचे नसतात. तर अश्या सर्व गोष्टींना तोंड देऊन ‘वाचन आणि लिखाण’ माझं या जगातील दुसरं आयुष्यसुद्धा! जे मी इच्छा झाल्यावर स्वतःला त्यात हरवूनही घेतो. कारण मला एवढं तर नक्कीच माहिती आहे, अर्थपूर्ण पुस्तके आणि अनुभव कधी खोटं बोलत नाही. पुस्तके व अनुभव माणसाला घडवतात आणि जीवन जगण्याची नवी उमंग देतात. या विचारवादी मनामध्ये बाह्यगोष्टी समजायला लागल्यावर तसेच प्रवासवर्णनीय, चरित्रात्मक तसेच स्मृतीकारक इत्या.  स्वविचारांचे ‘लेख’ किंवा ‘काव्य’ एका लेखणीतून कागदावर अक्षरी उमटवणे असा माझा छंद.

--/ चंद्रशेखर सावंत
मालाड, मुंबई : ४०० ०९७