तुम्हाला माहिती
असेलच, आपल्या पाठीवर सगळ्यात जास्त मायेचा हात कोणाचा असतो ते… निश्चित
तुम्हाला माहिती असणार! प्रथम आपल्या पाठींवर सदैव मायेचा हात फिरवणारी म्हणजे आपली ‘आई’. तर
याच माझ्या आईबद्दल एक आई-वेडा म्हणून लिहावेसे वाटते.
चित्रपट बघून झाल्यानंतर मला माझ्या राहत्या घरी जाताना
खूपच उशीर झालेला आणि त्यातही रस्त्यावर झालेली वाहनांची कोंडी, बाजूनेच एक
चार चाकी खाजगी वाहन गेलं आणि त्या वाहनाच्या
पाठीमागे लिहिलेलं 'ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काही नाही'. मी
थोडा वेळ हे वाक्य बघून विचारातच पडलेलो आणि हे वाक्य जणू माझ्या ‘हृदयातून’ कोरून
निघालं. सारखं-सारखं
माझ्या डोळ्यासमोर हेच वाक्य दिसत होते. विचार
करता-करता याच प्रश्नावर बरीच उत्तरे मिळाली आणि ह्या उत्तरांनी जणू माझं आता पुढील आयुष्यच बदललेले आहे. तसेच
एक ‘आदर्श गृहिणी’ म्हणुन आणि दैनंदिन जीवनात माझ्यावर लक्ष ठेवणारी म्हणजे माझी आई.
मालाड
मधील नामांकित शाळा म्हणजेच 'उत्कर्ष मंदिर’. तर
याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. शाळेच्या पहिल्याच दिवशी आई आणि बाबा हे दोघेही मला शाळेत
सोडायला आलेले, मला काही माहितचं नव्हते, मी कुठे आलो आहे आणि काय करतोय ते. अशा
वेळी माझ्या आईने माझ्यावर लक्ष ठेऊन, माझ्याबरोबर माझ्या बालवयाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सहवासात राहून मला
घडवले, हे क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. शाळेमध्ये ‘शिशुवर्ग’ आणि ‘बालवर्ग’ झाल्यानंतर
माझं ह्याच शाळेमध्ये प्राथमिक विभागात स्थलांतर झाले होते. प्राथमिक
विभागाच्या इयत्ता पहिली मध्ये पहिल्याच दिवशी मला शाळेच्या नवीन वर्गापर्यंत
सोडायला आलेली माझी आई, घरातला स्वयंपाक उत्तम रित्या पार पाडून झाल्यावर शाळेमध्ये
मला सोडायला व आणायला येणारी म्हणजेच माझी आई, तसेच
रोजचा गृहपाठ माझ्या कडून तपासून व माझ्या कडून शाळेचा गृहपाठ करवून घेणारी म्हणजे
माझी आई. माझ्या आई मुळे मी शाळेच्या अभ्यासाक्रमात चांगला बदल घडवू तितका पाहत होतो. त्याच बरोबर प्रगतीपुस्तकावरही शाळेच्या बाई टिपण्णी रकान्यात मनाला आनंद देणाऱ्या वाक्यांचा समावेश करून देत असत व पुढील प्रगती साठी त्यामुळे नवीन जिद्द हाती येत असे, याचं
सर्व श्रेय माझ्या आईलाच जातं. त्याच बरोबर मस्ती सुद्धा तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक हे हि मी निसंकोच
पणे व्यक्त करतो. छात्रबोधिनी वर तक्रार नोंदणी साठी काही पाने असत आणि ती माझी
पूर्णपणे भरलेली असत. जशी- जशी माझ्या मनाला उत्तमप्रकारे चांगली समजूत येत होती, त्यानंतर मग आईने माझ्या कडे जास्त
प्रमाणात लक्ष देणे कमी केलेले. तरीही
ती घरी माझी 'मुलाखत' नित्यनियामा प्रमाणे घ्यायायचीच. त्यामुळे
मला तिचा धाक असे. घरामध्ये कधी कार्यक्रम असले तर ‘उत्कृष्ट ठराव’ आणि ‘व्यवस्थापन’ करण्या मध्ये
मी माझ्या आईची परवानगी पहिली घेत असे आणि ती हि ‘स्पुर्थपणे’ परवानगी देत असे. तिनेही
मला कधी नाराज केले नाही, याला म्हणतात आईची मुलावरची माया. कधी
कधी माझं जर काही चुकून चुकीच्या गोष्टी घडत असतील तेव्हा ती मला अगदी
घरच्या कुटुंबात समजावून सांगणारी म्हणजे माझी आईच.
दहावीच्या
परीक्षेनंतर माझा ‘आजोळी’ जाण्याचा
बेत होता आणि तो यशस्वी पण ठरला. पण
मला माझ्या आजोळी एकटेच जावे लागले, आजोळ
चे ‘रमणीय वातावरण’ देखील उत्साहाने सहज पुढे सरकत होते. आजोळी
जाऊन बरेच दिवस झालेले, पण नंतर-नंतर मला करमेनासे वाटू लागले, त्याचं कारण म्हणजे माझ्या रोजच्या
सहवासात असणारी म्हणजेच माझी आई ही गावी नव्हती. भ्रमणध्वनी
द्वारे पण रोजच बोलून-बोलून तरी किती बोलणार? असा
प्रश्न उपस्थित झालेला. अशा वेळी शेवटी-शेवटी माझ्या कडे एकच पर्याय राहिलेला एकतर मी परत मुंबई ला
जाईन, नाहीतर आईला तरी गावी बोलवीन. थोड्याच
काही वेळामध्ये आईनेच मला कळविले कि मी स्वतः गावी येत आहे. हे
ऎकून मला तूर्त तरी खूप दिलखुलास आधार वाटलेला.
एक
लहान असतानाची हि एक गोष्ट, वयाच्या ९-१० वर्षापर्यंत तरी आई मला जेवण तिच्या हातानी भरवत असे, आणि
नंतर जर कधी मी आजारी पडल्यास डोक्यावर हात फिरवून ताप आहे कि नाही याची सारखी-सारखी ‘तपासणी’ करून
पाहणारी म्हणजे माझी सर्वप्रिय आईच. एकदा
लहान असताना हिवतापाचा आजार माझ्या जोडीस आलेला त्यामुळे रुग्णालयात मी लवकर बरा
व्हावा, म्हणून ‘स्व:हाताने’ मला जेवण भरवताना पाहिलेली माझी आई आजही डोळ्यासमोर आली कि डोळ्यातून ‘अश्रू’ पडल्याशिवाय
राहवत नाही. आज मला चुकून किंवा मुद्दाम आजारी पडावं लागलं तरी चालेल, कारण मला माझ्या आईच्या हाताने मला भरवलेला
जेवणाचा घास जणू ‘अमृताचा’ घासचं
वाटेल. एकुलता एक मुलगा म्हणून ‘रक्षाबंधन’ च्या
दिवशी माझ्या लेकराच्या हातात एकतरी ‘राखी’ असावी
असे समजून मला राखी बांधून मीच तुझी ‘बहिण’ असे
सांगितल्यावर माझ्या डोळ्यातून येणाऱ्या ‘अश्रूच्या’ धारांना
मला सावरता येत नाही आणि माझे समाधान त्यातच
आहे. शेवटी अजूनही खूप काही लिहिण्याचा प्रयत्न केला
तरी एकचं ‘हृदयी’ आहे
कि जर माझा या धरती वर ‘पुनर्जन्म’ झाला तर मला हीच माझी आत्ताची आई पाहिजे अशी सगळ्या
भगवंताना माझ्याकडून प्रार्थना असेल. माझ्या जननी बद्दल जेवढे लिहू शकेन तेवढे
कमीच आहे, कारण आईची माया हि ‘अनमोल’ असते.
--/चंद्रशेखर सावंत