शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

एक कप, अजुन एक!



रविवार म्हटलं तर माझ्यासाठी फिरण्याचा दिवस. कधी सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकसाठी जा, नाहीतर कोणत्या कार्यक्रमाला. पण एक स्वतःसाठी आरामात बसून वेळ घालवायचा असेल, तर ते म्हणजेटी लाऊंजमध्ये जाऊन निवांत मित्रांसोबत गप्पा मारत घालवणे. फक्त लाऊंज मध्ये जायायची खोटी असते, बाकीचे ओळखीचे किंवा मित्र मंडळी तिथे भेटतच राहतात. रविवारी कुठे खास जायचा बेत नसल्यास, मस्त आरामात दुपारचे झोपून उठल्यावर संध्याकाळी बाईक वरून मित्रा सोबत मालाड (पश्चिम) चिंचोली बंदर ला जायाचे चहा किंवा त्याच्या सोबत कॉम्पलीमेंटरी फूड इच्छा असल्यास नाहीतर माझी आवडतीपानचायऑर्डर करून गप्पा मारत रात्रीचे १२ / १२.१५ कसे वाजतात हे कधी मला कळत पण नाही.  चिंचोली बंदर मध्येबैठकम्हणून चहाचे खास दुकान आहे. त्यात चॉकलेट चाय, अदरक चाय, रोज चाय, पान चाय, इलायची चाय, मसाला चाय, उकाला इत्या. चहा चे प्रकार बाकीच्या गोष्टीत त्याचे कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, ग्रीन टी, आईस टी बरेच प्रकार आहेत तिथे पण मला तिथे गेल्यावर एकच दिसते. त्याच्या लाऊंज मध्ये गेल्यावर माझी सर्वात आवडती असलेली पान चहा. महेश शी ऑर्डर नक्की करून घ्यायची नंतर मोबाईल चा ब्लूटूथ साऊंड सिस्टम ला कनेक्ट करून गाणी ऐकत बसायची. असा समांतर छंद माझा मिरा-भायंदर मध्ये पण आहे पण हप्त्यातून कधी एकदा क्वचित तिथे गेलो तर जातो. अन्यथा आहे ते जवळचं तेच बरं.
चहा कसा हवा तर तरतरी देणारा, झोप उडवणारा, उत्साह देणारा. कॉलेजात असताना सकाळी .०० वाजल्यापासून ते १०.३० / ११.०० वाजेपर्यंत हमखास आमच्या संपूर्ण समूहाचा ११ ते १२ वेळा चहाच्या टपरीवर फेरा असायचा, तेव्हा तर आम्ही चहाचा ऑर्डर करताना कटिंग 'वन बाय टू' अशी ऑर्डर करायचो. त्यात आम्हाला आमच्या कॉलेज च्या पाठीमागे असलेला नागेश चहावाला हा अगदी मनमिळाऊ नम्र बुद्धिमत्तेचा, त्याची आमची जणू काय मैत्रीच जमलेली. आम्ही सर्व मित्रमंडळी त्याच्या टपरी वर असलो तर आमच्या विश्वासावर तो त्याचा चहाचा थर्मास घेऊन ठरलेल्या इतर दुकानदारांना देण्यासाठी जात असे, कारण त्याला माहित असे हे सर्व आले म्हणजे हमखास १५-२० मिनिटं इथेच घालवणार. पण नागेश हा अतिशय नम्र हुशार बुद्धीचा आहे. अजूनही कॉलेजात तो समोरून दिसला तर त्याची हाक मला असतेच असते.  
पण आत्ताच्या स्थितीला, माझा आत्ता दिवसातून फक्त - वेळा चहा होतो (पहिल्या प्रमाणापेक्षा कमी) मला चांगलंच आठवतंय, एकदा तर एका दिवशी पूर्ण दिवसातून २८ वेळा चहा झालेला त्याचे दुष्परिणाम मला जाणवू लागले. दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, पित्त इत्या. सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत होते. म्हणून मला माझ्या डॉक्टारांने सल्ला दिला कि कमी कर चहा आत्ता.  साधारणपणे मी इयत्ता दुसरी ला असल्यापासून चहा प्यायला लागलो हळूहळू मी अट्टल चहाप्रेमी झालो.
आपल्याकडे चहा खूप लोकप्रिय लोकमान्य आहे. चहाची लागवड सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाल्याचा उल्लेख आहे. सुरूवातीच्या काळात औषधी म्हणून चहाचा वापर केला गेला. नंतर माणसांना त्याची चटक लागली तो प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पंधराव्या शतकात डच लोकांनी आणि पोर्तुगीज मिशन-यांनी चहा चीनच्या बाहेर लोकप्रिय करायला सुरूवात केली. भारतात प्राचीन काळापासून औषधी कारणांसाठी चहा प्यायला जायचा. पण ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करून समस्त भारतीयांना चहाची सवय लावली. आत्ता ती सवय इतकी झाली आहे कि भारतात प्रत्येक घरात, बाहेर असलेल्या टपरी वर, कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसमध्ये सतत चहा प्यायला जातो. चहा या पेयाचा मूळ जन्म चीनमधला. अशी आख्यायिका आहे की, सुमारे पाच हजार वर्षापूर्वी एक चिनी सम्राटचेन नुंगउन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या नोकर-चाकरांच्यासमवेत एका दूरच्या प्रवासाला निघाला होता. वाटेत विश्रांतीसाठी थांबला असता त्याच्या नोकराने त्याला उकळवलेले पिण्याचे पाणी दिले. अचानक आलेल्या वा-याच्या झोताबरोबर जवळच्या झुडपाची काही सुकलेली पाने त्या पाण्यात पडली. कुतूहलाने त्या सम्राटाने ते विशिष्ट सुगंधी आणि गडद तपकिरी रंगाचे पाणी चाखले. त्याला ती चव आवडली. आणि त्या क्षणीचचहाहे पेय म्हणून जन्मास आले. त्यानंतर चहाच्या औषधी गुणांचाही शोध लागला. त्यानंतर चहा जगाच्या सफरीला निघाला आणि चहाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. चीनमध्ये चहा पिणे हे एक सांस्कृतिक कार्य असल्यासारखे पार पाडले जाते.
चहासाठी चिनी भाषेत जे वर्णन करून जे अक्षर वापरलेलं आहे ते आहेटे’. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे त्याचा उच्चार टी असा झाला. पोर्तुगीजांनी चहाचा प्रसार करतानाचाया उच्चाराचाही प्रसार केला. त्यामुळेच  आपल्या भारतात चहाला काही ठिकाणीं चाय म्हटलं जातं. चहामध्ये दूध आणि साखर घालूनपिण्याची पद्धत ब्रिटिशांनी चालू केली. सुरूवातीच्या काळात चहावर फार कर लावला जायचा असे मी ऐकून आहे. म्हणून चहाचा मागच्या दरवाज्याने व्यापार होत असे. पण पुढे ब्रिटिशांनी तो कर काढून टाकला आणि चहाला मान्यता मिळाली. चहाला इतिहास सुद्धा तेवढाच महत्वही आहे. बॉस्टन टी पार्टीतूनच पुढे अमेरिकेची क्रांती झाली. चहाच्या व्यापारातली चीनची मक्तेदारी उलथून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. सुरूवातीच्या काळात दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा लावल्या गेल्या. हळूहळू भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला लागली. आज भारत हा जगातला द्वितीय क्रमांकाचा चहा उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जात आहे. तसेच आयर्लंड हा जगातला सर्वाधिक प्रमाणात चहा पिणारा देश आहे. आयर्लंडमध्ये रोज प्रत्येक माणूस निदान - कप तरी चहा पितो.
चहा हे एक झुडूप आहे. जर पानं खुडलीच नाहीत तर चहाचं रोपटं १४ ते १७ मीटरपर्यंतही वाढू शकेल पण झुडुपाची उंची जितकी कमी तितकं शेतातून चहा काढणाऱ्यांना सोपं होतं. त्यामुळे सहज काढून होईल तेवढ्या उंचीपर्यंत त्या रोपट्याला वाढू देतात. त्यातही त्या झुडुपाच्या वरचा फक्त - इंचाचा भागच काढला जातो. त्याची पानं जितकी कोवळी तितका चहाचा दर्जा म्हणजे एकदम जबरदस्त असतो. भारतात आत्ता हिमाचल, केरळ, सिक्कीम, तामिळनाडू आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली जाते. आसाम टी किंवा दार्जिलिंग टी हे चहाचे प्रकार जगभर लोकप्रिय आहेत.
            चीन आणि जपान या दोन देशांमध्ये चहाला फार पूर्वीच्या काळापासून सांस्कृतिक महत्व आहे. जपानचाटी सेरेमनीफार प्रसिद्ध आहे. जपानमध्ये अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला चाकाई म्हणतात. तसेच टी सेरेमनीला आध्यात्मिकतेचा रंग आहे. ब्रिटिशांनीही हाय-टी चा प्रकार रूढ केला. दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण यात बराच वेळ जात असल्यानं त्यावेळी चहाबरोबर काहीतरी खायला केलं जायचं. शिवाय ब्रिटिशांकडे त्यावेळी नोकर नसायचे म्हणजे ते घरी किंवा कुठे अन्य ठिकाणी गेलेले असताना काहीतरी सोपे, सहज, घरातल्या बाईला करता येईल असे पदार्थ यावेळी केले जात. खरं तर दुपारचा चहा हा आरामात सोफ्यावर निवांत पडून घ्यायची गोष्ट होती. पण हायटीचं स्वरूप आल्यावर तो डायनिंग टेबलावर घेतला जायला लागला. आता तर इंग्लंडमध्ये हाय-टी सर्व्ह करणारी मोठ्या प्रमाणावर रेस्टॉरंट्स आहेत. हायटीबरोबर साधारणपणे सँडविचेस किंवा पेस्ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा सर्व्ह केले जातात.  
आपल्याकडे भारतात जशा चहाच्या टपऱ्या आहेत. तसे इराणमध्ये गोडाऊन आहेत. इराणमध्ये चहा भारतातून गेला खरा पण लवकरच त्यानं इराणचं राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळवली. इराणी लोक काळा चहा घेतात तो सुद्धा साखर घालता. पण चहा पिताना जिभेवर शुगर क्यूब ठेवून पितात. त्यामुळे तो चहा गोड लागतो. प्रवासात असताना असा चहा पिण्याची लज्जत काही औरच असते. आपल्या भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पहाटे किंवा कितीही रात्री या चहाच्या टपऱ्या उघड्या असतात. आसाम चहा हा काहीसा स्ट्राँग असतो तर दार्जिलिंग चहा चवीला सौम्य असतो. हल्ली ग्रीन टी पिण्याची खूप फॅशन आहे. चहाची पानं वाळवताना त्यांना हवेत वाळू देतात. तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होतं. जगभरात जास्तीत जास्त ब्लॅक-टी प्यायला जातो. त्याचा सुगंधही बराच काळ टिकतो. हर्बल टी म्हणजे एखाद्या झाडाची पानं, फुलं, बिया, मूळं गरम पाण्यात घालून बनवलेला अर्क. ओलाँग हा खास चिनी चहा आहे. तो स्ट्राँग असतोच शिवाय तो ग्रीन ब्लॅक अशा दोन्ही प्रकारांमध्ये आढळतात. हा ओलाँग चहा गैवान नावाच्या पात्रात बनवला जातो. चहा हा असा पेयप्रकार की, जो तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या स्वागताला हजर असतो आणि त्याला नकार देणं अवघड. गरमागरम वाफाळता चहा पिणं ही वेगळीच अनुभूती असते. सुखाच्या प्रसंगांची रंगत वाढवणारा आणि दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा प्यायलाच हवा.
इराणी हॉटेलातला चहा, उडपी हॉटेलातलातम्बीच्या हातचा दुधाळ चहा, टपरीवर मिळणारा काचेच्या पेल्यातीलदमदारचहा, भाजी मंडईत मिळणारा, कष्टाच्या गंधाचा अल्युमिनिअमच्या किटलीतला चहा, चहाचा मसाला घालून बनवलेला राजस्थानी तिखटसर चहा, लडाखचा लोणी मिसळून बनवलेला गुडगुड चहा, शिष्टाचार सांभाळत येणारा अतिशय सुबक कपबशीमधला सौम्य इंग्लिश हाय टी, सध्या चच्रेत असलेले ग्रीन टी, आइस टी असे अनेक प्रकार आपापली वेगळी रंगत राखून आहेत. चहाचे प्रयोजनच मुळात मनं जुळविण्यासाठी, जोडण्यासाठी केलेले दिसते. कोकणात आपल्या घरी कुणी पाहुणा आला तर त्याला प्यायला पाणी देता देताच चहाचे आधण ठेवले जाते. तेवढय़ा वेळात त्याची, त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली जाते. अगत्याने देऊ केलेल्या त्या घोटभर चहात पोटभर आनंद सामावलेला असतो. अनेकदा तिथली सकाळकाय शेजारी? चहा झाला का?’च्या गजरानेच सुरू होते.
           मित्रमैत्रिणींच्या समूहाबरोबर पावसाळ्यात एखाद्या ट्रीप ला जाताना रोडसाइड टपरीवर आलं-वेलची घातलेल्या वाफळत्या चहाला नको म्हणणारे. ‘मी चहा घेत नाही रे…’ असं म्हणणारे नक्कीच एक तरीकटिंगघेतल्याशिवाय राहत नाही. वर्षा ऋतू ची सुरुवात होत असतानाच मस्त एका चहाच्या टपरीवर गरमा-गरम भजी, वडापाव किंवा मिरचीबरोबर घेतलेला समोसा म्हणजे आहाहा... घरी आलेल्या पाहुण्यांनाचहा घेणार की कॉफी?’ असे विचारले तर पंधरा जणांपैकी बारा जणांचे उत्तरचहाहेच असते. अगदी हॉटेलमधल्या मेन्यूकार्डवरहॉट बेवरेजिसमध्ये चहाचा नंबर पहिला असतोच असतो.  
आपल्याकडेसुद्धा घरात अथवा दुकानात मंडळी चहा घेत असतील आणि त्यावेळी कुणी नवीन आला तर त्याला चहाचा आग्रह केला जातो. म्हणूनच चहा हा माणसांना जोडणारा भाग बनतो. आपल्या दिनक्रमात चहा हा अविभाज्य घटक बनला आहे.  चहाची नाती तोडण्याची नव्हे तर जोडण्याची आहेत. आपल्याकडे काही समाजात मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना भेटायला जाण्यालाचहा करायला जाणेअसं म्हणतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे खरोखरच भेटायला जाताना सोबत चहा पावडर साखर घेतली जाते चहा बनवून दिला जातो. दु: असलेल्या त्या घरात चूल पेटत नाही. निदान चहा पिऊन तरी त्या मंडळींना भेटायला आलेल्या लोकांशी बोलण्याची, त्यांना सामोरं जाण्याची ऊर्जा मिळावी हाच त्यामागचा हेतू असावा. चहाबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. सकाळी डोळ्यांवरची झोप आलं घातलेल्या चहाशिवाय उडत नाही. कुठल्याही गप्पांचं सत्र चहाशिवाय पूर्ण होत नाही. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर टपरीवर उभं राहून घेतलेल्या चहाची चव वेगळीच. प्रवासात स्टेशन आलं की चाय-गरमा-गरम चाय असं वाक्य ऐकल्यावर तो उकळलेला चहा घ्यावासाच वाटतो. खूप कामात असल्यावर बाजूला स्ट्राँग चहाचा कप हवाच. पावसाळी रात्री जेवल्यानंतरही अर्धा अर्धा कप चहा प्यावासाच वाटतो. आणि थंडीत हातात उबदार चहाचा कप घेऊन खिडकीत बसणं तर बहुआनंदच. चहाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही हे खरंच!

एक सामान्य माणूस धंद्याच्या निमित्ताने जर कोणता विचार करत असेल तर त्याच्या डोक्यात चहाचा धंदा हा हमखास येतोच येतो. अशा प्रकारे सुखाच्या प्रसंगात मैफिलीची रंगत वाढवणारा दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला लगेच एका चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा हा माझ्यासाठी नेहमीच प्रिय असेल.
--/ चंद्रशेखर सावंत