नुकतीच काही दिवसापूर्वी बातमी समजली, उत्तराखंड मधले 'ट्री मॅन' म्हणुन प्रख्यात असणाऱ्या श्री. विश्वेश्वर दत्त सकलानी यांना वयाच्या ९६
व्या वर्षी शुक्रवार दिनांक १८/०१/२०१९
रोजी वृद्धापकाळामुळे स्वर्गवास व्हावे लागले. फार वाईट
वाटतं असे कानावर येऊ लागले तर. विश्वेश्वर दत्त यांचा
जन्म उत्तराखंड च्या नवीन टहरी मध्ये, सकलाना पट्टीच्या
पुजार गाव या ठिकाणी २ जून १९२२ साली झाला. ज्यांनी
स्वतःचं संपुर्ण आयुष्य वृक्ष रोपणास घालवले. विश्वेश्वर
दत्त यांनी सर्दी, थंडी न बघता एकच वृक्षारोपणाचे लक्ष्य ठेवले ज्याच्या मुळे
त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या १० वर्षापासून त्यांना डोळ्यांचा त्रास
होऊ लागला (Eye Hemorrhage) व दृष्टी निघून घेली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ५० लाखाहून अधिक झाडे लावली. १९८६ साली त्यांना केंद्र सरकारने 'इंदिरा
प्रियदर्शनी वृक्ष मित्र' (IPVM) या पुरस्काराने
सन्मानित केले.
आपला देश औद्योगिक क्षेत्रात प्रगती करत असताना कित्येक ठिकाणी वृक्ष तोड
केली जाते. MIDC's, Corporate Sectors, IT Parks या
सारख्या वाढत जाणाऱ्या क्षेत्रात निसर्गाची हानी होत चालली आहे पण या सर्वांची
निसर्गाबरोबर परतफेड म्हणुन विश्वेश्वर दत्त यांचीच होती का? तो तर त्यांचा छंद व निसर्गप्रेम होतं. पर्यावरण वाचवणं हे प्रत्येकाचे
कर्तव्य आहे. आपल्यामुळे आज जर पर्यावरणाचा ह्रास होत असेल तर पर्यावरण उद्या
नक्कीच आपल्याला संपवेल यात मात्र शंका नाही. भारताची लोकसंख्या कोट्यवधीच्या घरात
आहे. प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात किमान ५ वृक्षरोहण
करुन त्याची पुर्तता करणे असे नवे धोरण सरकारने आखून ती योजना आमलात आणायला
पाहिजे. बरोबर ना??
वृक्षप्रेमी ‘विश्वेश्वर दत्त’ यांना निसर्गप्रेमी व ट्रेकर
कडून भावपुर्ण आदरांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
--/चंद्रशेखर
सावंत
Good information.. Grand Salute to Tree-man
उत्तर द्याहटवाThanks alot..
उत्तर द्याहटवा