शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

एक कप, अजुन एक!



रविवार म्हटलं तर माझ्यासाठी फिरण्याचा दिवस. कधी सह्याद्रीच्या कुशीत ट्रेकसाठी जा, नाहीतर कोणत्या कार्यक्रमाला. पण एक स्वतःसाठी आरामात बसून वेळ घालवायचा असेल, तर ते म्हणजेटी लाऊंजमध्ये जाऊन निवांत मित्रांसोबत गप्पा मारत घालवणे. फक्त लाऊंज मध्ये जायायची खोटी असते, बाकीचे ओळखीचे किंवा मित्र मंडळी तिथे भेटतच राहतात. रविवारी कुठे खास जायचा बेत नसल्यास, मस्त आरामात दुपारचे झोपून उठल्यावर संध्याकाळी बाईक वरून मित्रा सोबत मालाड (पश्चिम) चिंचोली बंदर ला जायाचे चहा किंवा त्याच्या सोबत कॉम्पलीमेंटरी फूड इच्छा असल्यास नाहीतर माझी आवडतीपानचायऑर्डर करून गप्पा मारत रात्रीचे १२ / १२.१५ कसे वाजतात हे कधी मला कळत पण नाही.  चिंचोली बंदर मध्येबैठकम्हणून चहाचे खास दुकान आहे. त्यात चॉकलेट चाय, अदरक चाय, रोज चाय, पान चाय, इलायची चाय, मसाला चाय, उकाला इत्या. चहा चे प्रकार बाकीच्या गोष्टीत त्याचे कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, ग्रीन टी, आईस टी बरेच प्रकार आहेत तिथे पण मला तिथे गेल्यावर एकच दिसते. त्याच्या लाऊंज मध्ये गेल्यावर माझी सर्वात आवडती असलेली पान चहा. महेश शी ऑर्डर नक्की करून घ्यायची नंतर मोबाईल चा ब्लूटूथ साऊंड सिस्टम ला कनेक्ट करून गाणी ऐकत बसायची. असा समांतर छंद माझा मिरा-भायंदर मध्ये पण आहे पण हप्त्यातून कधी एकदा क्वचित तिथे गेलो तर जातो. अन्यथा आहे ते जवळचं तेच बरं.
चहा कसा हवा तर तरतरी देणारा, झोप उडवणारा, उत्साह देणारा. कॉलेजात असताना सकाळी .०० वाजल्यापासून ते १०.३० / ११.०० वाजेपर्यंत हमखास आमच्या संपूर्ण समूहाचा ११ ते १२ वेळा चहाच्या टपरीवर फेरा असायचा, तेव्हा तर आम्ही चहाचा ऑर्डर करताना कटिंग 'वन बाय टू' अशी ऑर्डर करायचो. त्यात आम्हाला आमच्या कॉलेज च्या पाठीमागे असलेला नागेश चहावाला हा अगदी मनमिळाऊ नम्र बुद्धिमत्तेचा, त्याची आमची जणू काय मैत्रीच जमलेली. आम्ही सर्व मित्रमंडळी त्याच्या टपरी वर असलो तर आमच्या विश्वासावर तो त्याचा चहाचा थर्मास घेऊन ठरलेल्या इतर दुकानदारांना देण्यासाठी जात असे, कारण त्याला माहित असे हे सर्व आले म्हणजे हमखास १५-२० मिनिटं इथेच घालवणार. पण नागेश हा अतिशय नम्र हुशार बुद्धीचा आहे. अजूनही कॉलेजात तो समोरून दिसला तर त्याची हाक मला असतेच असते.  
पण आत्ताच्या स्थितीला, माझा आत्ता दिवसातून फक्त - वेळा चहा होतो (पहिल्या प्रमाणापेक्षा कमी) मला चांगलंच आठवतंय, एकदा तर एका दिवशी पूर्ण दिवसातून २८ वेळा चहा झालेला त्याचे दुष्परिणाम मला जाणवू लागले. दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, पित्त इत्या. सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत होते. म्हणून मला माझ्या डॉक्टारांने सल्ला दिला कि कमी कर चहा आत्ता.  साधारणपणे मी इयत्ता दुसरी ला असल्यापासून चहा प्यायला लागलो हळूहळू मी अट्टल चहाप्रेमी झालो.
आपल्याकडे चहा खूप लोकप्रिय लोकमान्य आहे. चहाची लागवड सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाल्याचा उल्लेख आहे. सुरूवातीच्या काळात औषधी म्हणून चहाचा वापर केला गेला. नंतर माणसांना त्याची चटक लागली तो प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पंधराव्या शतकात डच लोकांनी आणि पोर्तुगीज मिशन-यांनी चहा चीनच्या बाहेर लोकप्रिय करायला सुरूवात केली. भारतात प्राचीन काळापासून औषधी कारणांसाठी चहा प्यायला जायचा. पण ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करून समस्त भारतीयांना चहाची सवय लावली. आत्ता ती सवय इतकी झाली आहे कि भारतात प्रत्येक घरात, बाहेर असलेल्या टपरी वर, कॉलेजच्या कट्ट्यावर, ऑफिसमध्ये सतत चहा प्यायला जातो. चहा या पेयाचा मूळ जन्म चीनमधला. अशी आख्यायिका आहे की, सुमारे पाच हजार वर्षापूर्वी एक चिनी सम्राटचेन नुंगउन्हाळ्याच्या दिवसांत त्याच्या नोकर-चाकरांच्यासमवेत एका दूरच्या प्रवासाला निघाला होता. वाटेत विश्रांतीसाठी थांबला असता त्याच्या नोकराने त्याला उकळवलेले पिण्याचे पाणी दिले. अचानक आलेल्या वा-याच्या झोताबरोबर जवळच्या झुडपाची काही सुकलेली पाने त्या पाण्यात पडली. कुतूहलाने त्या सम्राटाने ते विशिष्ट सुगंधी आणि गडद तपकिरी रंगाचे पाणी चाखले. त्याला ती चव आवडली. आणि त्या क्षणीचचहाहे पेय म्हणून जन्मास आले. त्यानंतर चहाच्या औषधी गुणांचाही शोध लागला. त्यानंतर चहा जगाच्या सफरीला निघाला आणि चहाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. चीनमध्ये चहा पिणे हे एक सांस्कृतिक कार्य असल्यासारखे पार पाडले जाते.
चहासाठी चिनी भाषेत जे वर्णन करून जे अक्षर वापरलेलं आहे ते आहेटे’. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे त्याचा उच्चार टी असा झाला. पोर्तुगीजांनी चहाचा प्रसार करतानाचाया उच्चाराचाही प्रसार केला. त्यामुळेच  आपल्या भारतात चहाला काही ठिकाणीं चाय म्हटलं जातं. चहामध्ये दूध आणि साखर घालूनपिण्याची पद्धत ब्रिटिशांनी चालू केली. सुरूवातीच्या काळात चहावर फार कर लावला जायचा असे मी ऐकून आहे. म्हणून चहाचा मागच्या दरवाज्याने व्यापार होत असे. पण पुढे ब्रिटिशांनी तो कर काढून टाकला आणि चहाला मान्यता मिळाली. चहाला इतिहास सुद्धा तेवढाच महत्वही आहे. बॉस्टन टी पार्टीतूनच पुढे अमेरिकेची क्रांती झाली. चहाच्या व्यापारातली चीनची मक्तेदारी उलथून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. सुरूवातीच्या काळात दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा लावल्या गेल्या. हळूहळू भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला लागली. आज भारत हा जगातला द्वितीय क्रमांकाचा चहा उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जात आहे. तसेच आयर्लंड हा जगातला सर्वाधिक प्रमाणात चहा पिणारा देश आहे. आयर्लंडमध्ये रोज प्रत्येक माणूस निदान - कप तरी चहा पितो.
चहा हे एक झुडूप आहे. जर पानं खुडलीच नाहीत तर चहाचं रोपटं १४ ते १७ मीटरपर्यंतही वाढू शकेल पण झुडुपाची उंची जितकी कमी तितकं शेतातून चहा काढणाऱ्यांना सोपं होतं. त्यामुळे सहज काढून होईल तेवढ्या उंचीपर्यंत त्या रोपट्याला वाढू देतात. त्यातही त्या झुडुपाच्या वरचा फक्त - इंचाचा भागच काढला जातो. त्याची पानं जितकी कोवळी तितका चहाचा दर्जा म्हणजे एकदम जबरदस्त असतो. भारतात आत्ता हिमाचल, केरळ, सिक्कीम, तामिळनाडू आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली जाते. आसाम टी किंवा दार्जिलिंग टी हे चहाचे प्रकार जगभर लोकप्रिय आहेत.
            चीन आणि जपान या दोन देशांमध्ये चहाला फार पूर्वीच्या काळापासून सांस्कृतिक महत्व आहे. जपानचाटी सेरेमनीफार प्रसिद्ध आहे. जपानमध्ये अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला चाकाई म्हणतात. तसेच टी सेरेमनीला आध्यात्मिकतेचा रंग आहे. ब्रिटिशांनीही हाय-टी चा प्रकार रूढ केला. दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण यात बराच वेळ जात असल्यानं त्यावेळी चहाबरोबर काहीतरी खायला केलं जायचं. शिवाय ब्रिटिशांकडे त्यावेळी नोकर नसायचे म्हणजे ते घरी किंवा कुठे अन्य ठिकाणी गेलेले असताना काहीतरी सोपे, सहज, घरातल्या बाईला करता येईल असे पदार्थ यावेळी केले जात. खरं तर दुपारचा चहा हा आरामात सोफ्यावर निवांत पडून घ्यायची गोष्ट होती. पण हायटीचं स्वरूप आल्यावर तो डायनिंग टेबलावर घेतला जायला लागला. आता तर इंग्लंडमध्ये हाय-टी सर्व्ह करणारी मोठ्या प्रमाणावर रेस्टॉरंट्स आहेत. हायटीबरोबर साधारणपणे सँडविचेस किंवा पेस्ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा सर्व्ह केले जातात.  
आपल्याकडे भारतात जशा चहाच्या टपऱ्या आहेत. तसे इराणमध्ये गोडाऊन आहेत. इराणमध्ये चहा भारतातून गेला खरा पण लवकरच त्यानं इराणचं राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळवली. इराणी लोक काळा चहा घेतात तो सुद्धा साखर घालता. पण चहा पिताना जिभेवर शुगर क्यूब ठेवून पितात. त्यामुळे तो चहा गोड लागतो. प्रवासात असताना असा चहा पिण्याची लज्जत काही औरच असते. आपल्या भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पहाटे किंवा कितीही रात्री या चहाच्या टपऱ्या उघड्या असतात. आसाम चहा हा काहीसा स्ट्राँग असतो तर दार्जिलिंग चहा चवीला सौम्य असतो. हल्ली ग्रीन टी पिण्याची खूप फॅशन आहे. चहाची पानं वाळवताना त्यांना हवेत वाळू देतात. तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होतं. जगभरात जास्तीत जास्त ब्लॅक-टी प्यायला जातो. त्याचा सुगंधही बराच काळ टिकतो. हर्बल टी म्हणजे एखाद्या झाडाची पानं, फुलं, बिया, मूळं गरम पाण्यात घालून बनवलेला अर्क. ओलाँग हा खास चिनी चहा आहे. तो स्ट्राँग असतोच शिवाय तो ग्रीन ब्लॅक अशा दोन्ही प्रकारांमध्ये आढळतात. हा ओलाँग चहा गैवान नावाच्या पात्रात बनवला जातो. चहा हा असा पेयप्रकार की, जो तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या स्वागताला हजर असतो आणि त्याला नकार देणं अवघड. गरमागरम वाफाळता चहा पिणं ही वेगळीच अनुभूती असते. सुखाच्या प्रसंगांची रंगत वाढवणारा आणि दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा प्यायलाच हवा.
इराणी हॉटेलातला चहा, उडपी हॉटेलातलातम्बीच्या हातचा दुधाळ चहा, टपरीवर मिळणारा काचेच्या पेल्यातीलदमदारचहा, भाजी मंडईत मिळणारा, कष्टाच्या गंधाचा अल्युमिनिअमच्या किटलीतला चहा, चहाचा मसाला घालून बनवलेला राजस्थानी तिखटसर चहा, लडाखचा लोणी मिसळून बनवलेला गुडगुड चहा, शिष्टाचार सांभाळत येणारा अतिशय सुबक कपबशीमधला सौम्य इंग्लिश हाय टी, सध्या चच्रेत असलेले ग्रीन टी, आइस टी असे अनेक प्रकार आपापली वेगळी रंगत राखून आहेत. चहाचे प्रयोजनच मुळात मनं जुळविण्यासाठी, जोडण्यासाठी केलेले दिसते. कोकणात आपल्या घरी कुणी पाहुणा आला तर त्याला प्यायला पाणी देता देताच चहाचे आधण ठेवले जाते. तेवढय़ा वेळात त्याची, त्याच्या कुटुंबीयांची विचारपूस केली जाते. अगत्याने देऊ केलेल्या त्या घोटभर चहात पोटभर आनंद सामावलेला असतो. अनेकदा तिथली सकाळकाय शेजारी? चहा झाला का?’च्या गजरानेच सुरू होते.
           मित्रमैत्रिणींच्या समूहाबरोबर पावसाळ्यात एखाद्या ट्रीप ला जाताना रोडसाइड टपरीवर आलं-वेलची घातलेल्या वाफळत्या चहाला नको म्हणणारे. ‘मी चहा घेत नाही रे…’ असं म्हणणारे नक्कीच एक तरीकटिंगघेतल्याशिवाय राहत नाही. वर्षा ऋतू ची सुरुवात होत असतानाच मस्त एका चहाच्या टपरीवर गरमा-गरम भजी, वडापाव किंवा मिरचीबरोबर घेतलेला समोसा म्हणजे आहाहा... घरी आलेल्या पाहुण्यांनाचहा घेणार की कॉफी?’ असे विचारले तर पंधरा जणांपैकी बारा जणांचे उत्तरचहाहेच असते. अगदी हॉटेलमधल्या मेन्यूकार्डवरहॉट बेवरेजिसमध्ये चहाचा नंबर पहिला असतोच असतो.  
आपल्याकडेसुद्धा घरात अथवा दुकानात मंडळी चहा घेत असतील आणि त्यावेळी कुणी नवीन आला तर त्याला चहाचा आग्रह केला जातो. म्हणूनच चहा हा माणसांना जोडणारा भाग बनतो. आपल्या दिनक्रमात चहा हा अविभाज्य घटक बनला आहे.  चहाची नाती तोडण्याची नव्हे तर जोडण्याची आहेत. आपल्याकडे काही समाजात मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना भेटायला जाण्यालाचहा करायला जाणेअसं म्हणतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे खरोखरच भेटायला जाताना सोबत चहा पावडर साखर घेतली जाते चहा बनवून दिला जातो. दु: असलेल्या त्या घरात चूल पेटत नाही. निदान चहा पिऊन तरी त्या मंडळींना भेटायला आलेल्या लोकांशी बोलण्याची, त्यांना सामोरं जाण्याची ऊर्जा मिळावी हाच त्यामागचा हेतू असावा. चहाबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. सकाळी डोळ्यांवरची झोप आलं घातलेल्या चहाशिवाय उडत नाही. कुठल्याही गप्पांचं सत्र चहाशिवाय पूर्ण होत नाही. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर टपरीवर उभं राहून घेतलेल्या चहाची चव वेगळीच. प्रवासात स्टेशन आलं की चाय-गरमा-गरम चाय असं वाक्य ऐकल्यावर तो उकळलेला चहा घ्यावासाच वाटतो. खूप कामात असल्यावर बाजूला स्ट्राँग चहाचा कप हवाच. पावसाळी रात्री जेवल्यानंतरही अर्धा अर्धा कप चहा प्यावासाच वाटतो. आणि थंडीत हातात उबदार चहाचा कप घेऊन खिडकीत बसणं तर बहुआनंदच. चहाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही हे खरंच!

एक सामान्य माणूस धंद्याच्या निमित्ताने जर कोणता विचार करत असेल तर त्याच्या डोक्यात चहाचा धंदा हा हमखास येतोच येतो. अशा प्रकारे सुखाच्या प्रसंगात मैफिलीची रंगत वाढवणारा दु:खाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला लगेच एका चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा हा माझ्यासाठी नेहमीच प्रिय असेल.
--/ चंद्रशेखर सावंत

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

हर्षवणारा हर्षेवाडीतला 'हरिहर' उर्फ हर्षगड.






मला एकदा अक्षय चा फोन आला आणि म्हणाला, आपल्याला येत्या शनिवारी नाशिक येथे असणाऱ्या हरिहर ला जायायचे आहे. बोललो त्याला, जाऊया त्यात काय. व येणाऱ्या शनिवारी म्हणजेच ०७/१२/१९ या दिवशी आम्ही रात्री नाशिक येथे निघण्यासाठी सज्ज झालो. शनिवार च्या दिवशी घाई घाई मधून निघताना आम्ही एक्स्प्रेस ने जायायचे ठरवले. दादर पर्यंत मुंबई ची लाईफ लाईन म्हणून ओळखणाऱ्या लोकल चा प्रवास व पुढे आम्ही नाशिक रोड वरून जाणारी 'अमृतसर एक्स्प्रेस' पकडली, आत्ता जनरल डब्याचा प्रवास कसा असतो हे मला काय विशेष सांगायला नको. साधारण सकाळी ०३.४० च्या आसपास आम्ही नाशिक रोड ला पोहोचलो, पण पुढचा मार्ग कोणालाच माहीत नव्हता. मी मागे एकदा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये खास हरिहर साठी गेलेलो तो म्हणजे कसारा मार्गे पण तो हरिहर साथीचा पहिला प्रवास माझा वेळे अभावी पूर्ण होऊ शकला नाही. त्याची खंत मला अजूनही जाणवते. तेव्हा पासून गडावर जाण्यासाठी तरी कितीही दिवसभराच्या घाई घाई मध्ये असलो तरी निघणार व ठरलेल्या वेळेनुसार, सुरवातीला भेटावयाच्या ठिकाणी पोहोचणार.

सकाळी नाशिक रोड ला बाहेर पडताच चहाचे ५-६ स्टॉल्स दिसले. त्यातल्याच एका स्टॉल वर सर्वजण गेलो. पण आमचा चहा विक्रेता हा विशेष होता. चहा बनवताना मोठ्या आवाजात व सुरात 'घ्या चाय गरम.. चाय गरम, सुपर स्पेशल गरमा गरम... हाहाहा...  हे मात्र आम्हा सर्वांना ताजेतवाने होण्यासाठी चहासोबत मिळालेली कॉम्लिमेंटरी होती असे म्हणायला काय हरकत नाही. शेवटी त्याच्याही धंद्या निमित्त माणसांना आकर्षित करून घेणं हे त्याचं कर्तव्य होतं. चहापान वैगरे झाल्यावर, पुढे आत्ता जायायचे कसे? हा मात्र मोठा प्रश्न होता. मी एका व्यक्तीला विचारले तिथे, हरिहर गडावर जाण्यासाठी गाड्या कोणकोणत्या उपलब्ध असणार आहेत? आत्ता त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बघूनच मला कळून आलेले, येथे काय जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही कारण हरिहर हा शब्दच त्या व्यक्ती साठी नवीन होता. सरळ समोर असलेल्या एस. टी. स्थानकामध्ये मध्ये गेलो व एक 'पंचवटी भोग' नावाची स्थानिक फेरा मारणारी बस लागलेली, लगेचच त्या बस चालकांना विचारले. मास्तर, हरिहर गडावर जाण्यासाठी कुठची बस आहे आत्ता?  मास्तर म्हणाले, तुम्ही एक काम करा सीबीएस रोड ला चला तिथून तुम्हाला गाड्या मिळतील. लगेच मित्रांना बोलवून म्हणजेच ७ जणं आम्ही बस मध्ये आलो, पुढे ५ ला सीबीएस च्या डेपो मध्ये येताच तिथल्या प्रवासी संपर्क केंद्र मध्ये विचारताच कळले, की त्या ठिकाणी जाणारी त्रंब्यक साठी ५ ची बस नुकतीच निघाली. म्हणजे आमच्यासाठी हे आत्ता दुर्दैवच झाले. दुसरी बस तासाभरात येणार होती व ती सुद्धा त्रंब्यक पर्यंतच पण पुढे काय? पुढे जाण्यासाठी गाड्यांची सोय असेल का नाही? यासाठी आम्ही ओला, ऊबर किंवा मिळेल ती खाजगी गाडी बघून निघायचे असे ठरवले, पण त्यात सुद्धा गाडी लगेचच मिळत नव्हती. म्हणून आम्ही ऑटो करायची ठरवले पण ऑटो वाला ७ जणं घेऊन बसवणार तरी कुठे? ही मोठी पंचायत. पण ह्याचं उत्तर त्यानेच आम्हाला दिलं. त्याने ५ जणांना मागे बसायला सांगितले. त्यात रोशन, वैभव, सौरभ, दर्शन आणि प्रसाद व पुढे एका बाजूला मी तर दुसऱ्या बाजूला अक्षय बसलेला. ५ मिनिटांवर असणाऱ्या पेट्रोल पंप पर्यंत प्रवास व्यवस्थित झाला. पुढे ह्या प्रवासाचा अक्षरशः वैताग आलेला. तरी पण जायायचे होते ना, मग तिथे 'नो आर्ग्युमेंट'. हे सर्व फक्त ध्यानात होतं व हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. ऑटोवाल्या काकांबरोबर गप्पागोष्टी करत प्रवास चालू होता. त्यांच्या ऑटो चालवण्याच्या अंदाज वरून आम्हाला कळून येत होते की आपण कुठे तरी सकाळ सकाळी फसलोय. फक्त ४०-५० च्या गतीने ऑटो चालवली तर कसं काय व्हायचं? वरून त्यात गती रोधक आले तर अगोदरच ३-४ मीटर ते ब्रेक मारायचे, ह्या सर्व घटना पाहून खरोखरच आम्हाला वैताग आलेला. शेवटी पुढे बसलेले अक्षय व मी म्हणालो काका द्या आमच्याकडे गाडी! तुम्ही फक्त बसा. तेवढ्यातच बाजूने एक भरघाव वेगात एस. टी. गेली हे बघून आम्ही अजून चिंतेत पडलो. ऑटोवाल्या काकांची बडबड चालू होती पण नंतर आम्हाला झोपेच्या झपक्या यायायला लागलेल्या व नाशिक ची थंडी खूप झोंबत होती. त्रंब्यक च्या पुढे आल्यावर ऑटोवाल्या काकांबरोबर आमचे पटेनासे झाले. कारण त्याला कारणच तसे आहे. सुरवातीलाच आम्ही Google Map च्या साहाय्याने सांगितले सुद्धा, त्रंब्यक च्या पुढे १४ एवढे किमी. अंतर आहे ते आम्ही तुम्हाला Google Map वरून दाखवू व त्यांनां तेव्हा हे मान्य होते. त्रंब्यक च्या पुढे आल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलेले हे आत्ता नाटकं करणार म्हणून व शेवटी तेच झाले. कशापायी तुम्ही मला इथं आणलंत.. इथं वाघ येतो, सिंह येतो.. कशाला सकाळ सकाळी डोकं खराब करू लागल्यात.. इत्या. तरी मात्र सौरभ पाठीमागे Google Map लाऊनच बसलेला. पुढे काही अंतरावर म्हणजेच जव्हार मार्गाने जात असताना अंबोली च्या फाटका वर आम्ही उतरलो. परत त्याची तिथे रक्कम मागणी जास्त झाली. आम्ही शब्दाला शब्द न वाढवता ते सुद्धा दिले. असो.. हे सर्व होत राहतं त्यामुळे त्याचे काय जास्त मनाला वाटले नाही. प्रत्येक प्रवास हा वेगळाच असतो व माझ्यामते तो असावाच! थंडी इतकी होती खिशातून हात बाहेर यायायला मागत नव्हते. खिशातून फोन बाहेर काढायचा म्हटलं तर हात बाहेर यायला मागत नव्हते, पुढे एक गृहस्थ समोर आला व चहा साठी विचारू लागला, व्यवस्थित ताजेतवाने होण्यासाठी चहा शिवाय आम्हाला काय पर्याय नव्हता. म्हणून रस्त्या लगतंच असणाऱ्या त्याच्या घरी तो घेऊन गेला. चहा पिताच, चहाचे पैसे देऊ नका! असे सतत तो म्हणत होता पण इतक्या थंडीत आम्हाला चहासाठी समोरून येणारा व्यक्ती म्हणून त्याच्या मुलाच्या हातात काही रक्कम ठेवली. पुढे मार्गस्थ होत होत सौरभ च्या दृष्टिक्षेपास येणारे बरेच आडवे रस्ते, शेतातून निघणारे रस्ते याचा अंदाज घेऊन आम्ही सर केले. त्यामुळे वेळ थोडफार का होईना पण वाचला. अंबोली ते हर्षेवाडी १० किमी चे अंतर मस्त गप्पा मारत व निसर्गाचा आनंद घेत आम्ही हर्षेवाडी पर्यंत पोहोचलो हे आम्हाला कळले सुद्धा नाही. हर्षे वाडी लागताच पाऊण तास तरी तिथे आम्ही आराम केला व न्याहरी साठी तेथील असलेल्या घरगुती खानावळी मध्ये कांदापोह्यांची मागणी केलेली म्हणून ते खाऊन आम्ही गड चढण्याचा दिशेला मार्गस्थ झालो.




गडाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सुरवातीला नयनरम्य पाण्याचा बांध दिसला, गड चढत असतानाच निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घेण्यास आम्हाला प्रचंड आनंद होत होता. एक तासाभरात आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वार जेथून स्पष्ट दिसून येतो अश्या ठिकाणी पोहोचलो व मनाला एक दिलखुलास आनंद तर मिळालेलाच. पण तेवढी थोडीफार शंका सुद्धा भासू लागली. हा गड आपण सर करू का नाही ते. पण एकदा ठरवले माथ्यापर्यंत जायायचे, का मग जायायचेच! वाटेत मिळणारे लिंबूपाणी व वैभव ने आणलेलं रियो हे ह्या सर्वाचा आनंद घेत आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्याची सुरुवात जेथून होते तेथे पायथ्या लगतच आम्ही बसून पाहिले पायऱ्यांचे निरीक्षण केले ८० अंशातला थरार, पहिलं तेथे भेटलेल्या शेपूट वाल्या मित्रासोबत पाहून घेतला व एकदा मार्गी लागल्यानंतर पायऱ्यांवर पाय ठेवल्यानंतर काहीच वाटले नाही.



सौरभ ने घेतलेल्या सेल्फी मध्ये संपूर्ण समूह.



हर्षवाडी मध्ये भेटलेला कोकरू. 


,१२० मीटर उंचीचा हरिहर ओळखला जातो, ते येथील विशेष पायऱ्यांमुळेच. एक आधार म्हणून प्रत्येक पायरी मध्ये खोबण्या आहेत, त्यामुळे चढाई व उतरते वेळीस आधार नक्कीच मिळतो. माहितीनुसार हा हरिहर किल्ला अहमनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्याचाच जवळपास असलेल्या त्रंब्यक गडासोबत तोही गड जिंकून घेतला. १८१८ मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे चालून गेल्यावर डावीकडून नजरेस पडणारी वाट हे सर्व अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडाच्या मुख्य द्वारामधून प्रवेश केल्यावर समोरच शेंदूर लावलेला गणपती नजरेस पडतो. तिथे थोडीफार बसण्यासाठी मोकळी जागा आहे. तिथे थोडा आराम वैगरे करून आम्ही पुढे निघताच एक डाव्या बाजूला निसर्गाच्या मोहात टाकणारं दृश्य नजरेस पडते व परत जरा पुढे आल्यावर पूर्णतः ८५ अंशातली चढाई व ती सुद्धा चढाई मध्येच वळण घेतलेली वाट आहे. तेथून दिसणारी खोल दरी म्हणजे पायऱ्यांच्या खोबणी मधील हात नाही काढून देत. हा असा थरारी प्रवास झाल्यावर पुढे सरताच हनुमानाचे मंदिर व विशेष म्हणजे हा हनुमान मिश्या असलेला आहे. शेजारीच उघड्यावर शिवलिंग व नंदी आहे.  समोरच तलाव आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. सभोवतालच्या परिसरात ७ जोडटाके नजरेस येतात. ह्यातील पाणी मी माझ्याकडे असलेल्या पिणाच्या बाटली मध्ये घेऊन टाळू थंड करण्यासाठी बाजूला जाऊन माझ्या टाळूवर स्वतःच ओतत राहिलो व एकदम थंडावा मिळू लागला. एवढं सर्व होऊन सुद्धा वैभव म्हणाला, चला अजुन समोर जाऊन येऊ अजुन एक शेवटचा टोक ५०-६० फुटांचा बाकी आहे. सर्व जण उन्हात थकलेले असल्यामुळे इतर कोण तयारही होत नव्हते. मग वैभव मला बोल ला चल शेखर आपण जाऊन येऊ. कदाचित त्याच्यामुळेच नी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकलो. अन्यथा ते ठिकाण माझं राहून गेले असते आणि मनाला तेवढीच खंत वाटत राहिली असती की किल्ल्यावरील सर्वात उंच जागा राहून गेली. गडाच्या माथ्यावरुन समोरचे मोहवणारे दृश्य तेथून पूर्वेकडे असलेले त्रंब्यक डोंगररांग, दक्षिणेला वैतरणा तलावाच्या येथील उभे असलेले कावनाई व त्रिंगल वाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षित करून टाकतात तर उत्तरेला वाघेरा किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून खाली उतरल्यावर घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी नजरेस पडते. तेथून दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. ह्या सर्वांचे दर्शन घेत तिथून परतीच्या मार्गावर येत असतानाच वाटेत आमच्या कडे नजर लाऊन बसलेले आमचे साथीदार भेटले व एक मज्जा म्हणून सर्व जण टाळ्या वाजवू लागले. आत्ता ही एक कल्पना कोणाची होती हे मला अजुन कळलेली नाही. पुढे उतरते वेळी फोटोसेशन व पाठीला आराम मिळावा म्हणून वाटेत आडवे सुद्धा झालो. त्यात अक्षय तर सावलीचा आधार घेत मनापासून मस्त झोप घेण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित आरामाची खूप गरज असावी त्याला त्यावेळेला. पुढे पुन्हा खाली आल्यावर  खानावळी च्या ठिकाणी थोडे फ्रेश होऊन, आम्ही परतीच्या प्रवासासाठी चंदर म्हणून असणाऱ्या एका बोलेरो मालकाला फोन केला. ह्याचा संपर्क आम्ही खानावळी मधूनच घेतलेला. त्यांना सांगितले आम्हाला त्रंब्यक पर्यंत घेऊन चला, पुढे कसं काय मुंबई ला पोहोचायचे त्याचं गाडीत बसल्यावर विचार करू. शेवटी सरकारी गाड्यांचा आधार घेत आम्ही मुंबई मध्ये राहत्या घरी, रात्री ९ च्या आसपास पोहोचलो. अश्याप्रकारे हरिहर गड हा आमच्या साठी एक विशेष प्रवास अनुभव देणारा राहिला पण हरिहर गड मनाला खूप भावला.



गडावर असलेले मारुती रायाचे मंदिर


गडावरील तलाव व सोबतच शिवलिंग तसेच नंदीचे दर्शन.




              या हरिहर च्या प्रवासात एकमेकांना साथ देणारे सर्वच मित्र अफलातून होते व आहेत.

--/चंद्रशेखर सावंत

मंगळवार, २ जुलै, २०१९

सोनगिरी ट्रेक






               ट्रेक म्हणजे ट्रेकर्स च्या आयुष्यात एक वेगळाच अविभाज्य भाग असतो, तो त्याला नवी विचारधारा घेऊन जगायला प्रेरित करतो आणि प्रत्येक ट्रेकर्स च्या व्याख्या ह्या त्याच्याप्रमाणे भावनीक असतात, त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून ट्रेकर्सची ची व्याख्या शब्दात मांडणे कठीण होईल आणि प्रयत्न जरी केला तरी शब्द अपुरे पडतील... 



               ३० जून ला माझं मुळात नाशिक येथे 'हरिहर' ला जाण्याचे ठरलेले, पण काही कारणात्सव तेथे रद्द करावे लागले आणि रोशन सोनगिरी ट्रेक संदर्भात, गेल्या एक आठवड्यापासून माझ्या संपर्कात होता. अगदी सर्वकाही तयारी असूनही शेवटच्या क्षणी हरिहर साठी रद्द झाले, म्हणूनच मी या सोनगिरी ला येऊ शकलो, ह्यात काही शंका नाही. 

 

               ठरल्याप्रमाणे सर्व योग्य वेळेवर कर्जत ला पोहोचले. रोशन बरोबर माझे पहिलेच ट्रेक होते, त्यामुळे तो समोर असलेल्या व्यक्तींशी ओळख करून देत होता. असे होत होताच थोड्याच वेळात जयेशने ने सर्वांना  चहासाठी विचारले आणि चहा म्हणजे माझ्यासाठी ट्रेक च्या अगोदरचं पहिले समाधान. थोड्याच वेळात सर्वांचे चहापान झाल्यावर आम्ही सर्व सोनगिरी गडाच्या पायथ्याशी रवाना झालो. गाडीतून उतरताच काही मिनिटांनी वरूण राजाने हजेरी लावली आणि सर्वांचे स्वागत केले. मनामध्ये लगेच एक आठवण ताजी झाली. १६ जून च्या रविवारी मी 'कळसुबाई ट्रेक' करून पायथ्याशी परतल्यावर पाऊस आलेला. तेव्हा यशस्वी ट्रेक पूर्ण झाल्यावर बक्षीस म्हणून आणि आत्ता ट्रेकिंग ला सुरुवात म्हणून पावसाचं आमच्यासाठीचं स्वागत म्हणून येणं, हे मनाला एक वेगळाच आनंद देत होते. व्यक्ती मोजणी साठी वर्तुळाकार रिंगण करून मयूर दादाने माहिती दिल्यावर आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. पावसामध्ये गड चढण्याचा आनंदच वेगळा होता. मयूर दादा आणि जयेश आयोजक असल्यामुळे वाटा अगदी सहज सापडत होत्या. काहीच वेळात मोकळी निसर्गरम्य जागा मिळाल्यामुळे तेथे फोटोसेशन चालू केलेले व एक आवड म्हणून मामांनी एका वाहत्या पाण्यात छोटासा धरण बांधलेला. थोड्याच वेळात असे समजण्यात आले कि अजून पुढे वर गेल्यावर प्रशस्त अशी मोकळी जागा आहे, त्यामुळे आम्ही तेथून निघालो. ठरल्याप्रमाणे पुढे आल्यावर फोटोसेशन परत चालू केले, पण जयेश, मयूर व ३-४ इतर सहकारी बांधव ब्रेकफास्ट म्हणून चायनीज भेळ बनवण्यासाठी गेले. ब्रेकफास्ट आणि फोटोसेशन आटपल्यावर पुढील ट्रेकसाठी पुन्हा सर्वजण सज्ज झाले. मित्रभाऊ रोशन सोबतच होता, शिवाय अन्य मित्र ही सोबत होते. रोशन मला अगदी सुरवातीपासून त्याला माहित असल्याप्रमाणे झाडांची माहिती देत होता. शेखर... हे बघ ह्याची अशी भाजी करतात. त्याची तशी भाजी करतात वैगरे...वैगरे... पायवाटांच्या बाजूलाच मश्रुमही दिसत होते. 'करटावले' म्हणून एक फळ येते ते मला रोशन च्या सांगण्यावरून माहित झाले.. ते शोधण्यात रोशन ट्रेक चालू असताना मध्येच व्यस्त झालेला आणि वरून सांगत पण होता कि हे तुला सहज दिसणार नाहीत, वेलींच्या खाली दिसतील. अशी मज्जा आणि निसर्गाचा आस्वाद असताना फार मोठा आनंद वाटत होता. गडाच्या माथ्याशी पोहोचतेवेळी मध्येच २ पॅच खडतर होते. पण ते आयोजक, तसेच चंदू आणि जीत व इतर सहकारी यांच्या मदतीमुळे सर्वांना सहज शक्य झाले. वाटेतच मुंग्याचे वारुळही दिसत होते, मयूर दादाने सांगितले मुंग्यांच्या वारूळाचा आकार ज्या ठिकाणी निमुळता असेल ती म्हणजे पूर्व दिशा. हे मला त्याच्या सांगण्यावरून कळले. सर्वात शेवटचा म्हणजेच तिसरा पॅच हा खडतरच होता, पण कातळ असल्यामुळे फारसे जाणवले नाही. फायनली गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर मंद वारा, रिमझीम येणारा पाऊस व धुके हे म्हणजे फार एक जबरदस्त आल्हाददायक होते. तिथेही फोटोसेशन व नंतर स्वप्नील ने शिववंदना दिली व आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात करताच बाहेरील अन्य दोनशे ट्रेकर्सचा समूह सुद्धा तेथे आलेला, तिथे एकच पायवाट असल्यामुळे अव्यवस्था निर्माण झालेली, तरी सुद्धा आम्ही आळीपाळीने मार्गस्थ होत होतो. उतरताना मातीच्या २ खडतर पॅचची रिस्क होतीच. पण जयेश, चंदू, मयूर, जीत, स्वप्नील व रोशन यांच्यामुळे तसेच इतर सहकार्यांमुळे वाट उतरणे अगदी सहज सोप्पे झाले. आठवणींचे जतन व्हावे म्हणून चंदुदादाने स्नॅप्स शुट करणे चालूच ठेवलेले. पुढे ज्याठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट ला थांबलेलो त्याच ठिकाणी दुपारच्या जेवणाची सोय होती. अगदी पुरेपूर आणि मस्त जेवण झाले. निसर्गाच्या सानिध्यात होणारे जेवण म्हणजे मनाला सुख:द धक्का देणारा आनंद होता. हे सर्व झाल्यावर पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.  उतरण्याच्या वेळेस फटाफट येत होतो, पण त्यात एका ठिकाणी रस्ता चुकला आणि वेळीच डिंपल वहिनींच्या लक्षात आले. परत थोड्याच वेळात लक्षात आले कि दुसऱ्या वाटेने निघायचे आहे, जो रेल्वे ट्रेकवर नेत होता. रेल्वे ट्रेक वर पोहोचताच थोडासा आराम केला कारण सर्वजण जमा होणे बाकी होते. 


                सर्वजण जमल्यावर गाड्या जिथे येणार होत्या तिथे परत मार्गस्थ होण्याची सुरुवात केली. वाटेतच एक छोटा अजगर अर्धमृत अवस्थेत सापडलेला, बहुतेक अगोदर त्याला कोणी मारण्याचा प्रयत्न केला असावा, पण काही कथा वाचून आहे, त्यामुळे त्याच्या जवळ जास्त जाण्याचा मी काही प्रयत्न केला नाही. पुढे गाड्या आल्यावर आम्ही सर्वजण तेथून निघताच मामा व एक मित्र तेथून निघून जाणार असे कळल्यावर त्यांना निरोप देऊन आम्ही सर्वांनी परतीच्या प्रवासास सुरुवात केली. निघाल्यावर रोशन गाडीमध्ये बाजूलाच होता त्यामुळे रात्री च्या जेवणासाठी आग्रह करत होता. घाटकोपर ला फ्रेश हो जेवून घे आणि मग आरामात मालाड ला निघ. असे बोलत होता. पण त्याला बोललो आत्ता नको नंतर निवांत येयीन तुझ्याकडे..




              
               अशाप्रकारे सोनगिरी ट्रेक हा खूप मस्त एक्सप्लोर केला. त्यात नवीन मित्रमंडळींशी ओळख झाली. सर्वांनी फार चांगल्या प्रकारे सुयोजन केले. सर्वांचीच नावे घेत राहिलो तर पुन्हा परत एकदा लिस्ट बनेल. व सर्वांचे आभार मानले तर योग्य राहणार नाही, कारण आभार मानून नुकतेच नवनवीन झालेल्या मित्रमंडळींना परके केल्यासारखे वाटेल. म्हणून आभार न मानता तुर्तास थांबतो, व पुढच्या ट्रेकला नक्कीच भेटू!


--/ चंद्रशेखर सावंत

शनिवार, २३ मार्च, २०१९

स्वराज्य निर्माता


                 छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रामधीलच नाही तर संपूर्ण भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. त्यांची आई जिजाबाई हि रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावातील. लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याची जिद्द बाळगणाऱ्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला. (तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख बदलत असते.) शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं. शिवबाच्या मातृभक्तीचं प्रत्यय यावं यासाठी एका प्रसंगाची आठवण करुन देणं आवश्यक वाटते. एके दिवशी शहाजीराजे शिवबासह विजापूरच्या आदिलशहांना भेटण्यासाठी गेले होते. शहाजींनी बादशाहाला मुजरा केला. शिवबा मात्र ताठ मानेनं बादशहांना न्याहाळीत होता. शहाजी शिवबांजवळ गेले आणि बादशाहाला मुजरा करण्यास सांगितले. परंतु शिवबा नि:स्तब्ध होते. जिजाउंची शिवबाला शिकवण होती की, प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. हीच शिकवण आत्मसात करुन शिवबांनी सुलतानाला मुजरा करण्यास नकार दिला. खरं तर शहाजीराजेंची अवज्ञा करण्याचा शिवबाचा हेतू नव्हता. योग्य नसलेल्या माणसाला मुजरा नाकारला, यात शिवबाचं काय चुकलं, असा प्रतिसवाल जिजाऊंनी शहाजीराजेंना या घटनेवर चर्चेदरम्यान केला. आईसारखे परमदैवत दुसरं नाही, हे शिवबाच्या मातृभक्तीने सिद्ध केलं.
                  स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा नाईनाट करून सर्व हिंदुस्थान मुघल साम्राज्य करून टाकावा या आकांशेने झपाटलेला औरंगजेब बादशाह हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाऊ आणि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या गुणांचा विकास केला आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’  हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुस्लीम व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा होता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची हिम्मत झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते चातुर्याने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवबाला युद्धतंत्रांचे शिक्षण देण्यासाठी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. तलवार चालविणे, तिरंदाजी करणं, लढाईचे आराखडे तयार करणे, मैदानावरील तसेच डोंगरी मुलूखावरील लढाई कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या कथांच्या माध्यमातून रामाचा पराक्रम, भीमार्जुनाचे युद्धकौशल्य, युधिष्ठीरची धर्मनिष्ठा, पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीकृष्णाने वापरलेली कुटील-नितीची शिकवण दिली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचा. शिवबाला छत्रपती बनविण्यासाठी जिजाऊंनी प्राणपणालालावले.
             शिवाजी महाराजांना लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले. दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकून सवंगडी जमा केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले.  एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यांपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दाम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी ‘तोरणागड’ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा वापर जास्त केला. राक्षसी प्रवृत्तीचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरल्याप्रमाणे मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी महाराज सावध होतेच. हातात ठेवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेले. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते.  सिंहगड घेतांना तानाजी पडला. खिंड लढवितांना  बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपले प्राण दिले . स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते.
लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या जिजाबाई यांच्याशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. लोकांनी जयजयकार केला. जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न 1674 साली अखेर प्रत्यक्षात उतरलं. ६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. ६ जून १६७४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.
                शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले.  संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

                                                          शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी

                महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.

--/ चंद्रशेखर सावंत