सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

देवकुंड आणि ताम्हिणी घाट



निसर्गाच्या कुशीत गर्द रानावनात एक स्वर्गात घेऊन जाणारा मार्ग म्हणजे देवकुंड. आमचं सकाळी तीन वाजता निघायचं ठरल्यानुसार अगदी सर्व वेळेत नियोजन पद्धतीने होत होते. शुभम ३ वाजता मिरा भायंदर वरून निघाला व मला मालाडला नेण्यासाठी आला. मनात अगती चैतन्याचे वातावरण होते कारण आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जात होतो. पुढे जाता जाता आम्ही ०६:१५ च्या आसपास मुंबई पुणे च्या पहिला टोल नाका पार केलेला व हायवेला चहापाण्यासाठी थांबलेलो थोड्यावेळात तिथून डाव्या बाजूला वळण घेतल्यानंतर आम्ही पालीचा मार्ग पकडुन पुढे येण्यासाठी तर निघालेलो पण त्या Google Map च्या नादाला लागून त्याला follow करत राहिलो आणि रस्ता तेवढ्यातच चुकलो, रस्ता कुठेतरी शेतात घेऊन गेला आणि पुढे रस्ताच बंद झाला. शुभम गाडी चालवताना बोलत होता आपली गाडी काय महिंद्राचा ट्रॅक्टर आहे का ह्या शेतात आणायला. अशा प्रकारे असे बरेच हास्य विनोद होत होते.. नंतर वाटेत एक औद्योगिक कंपनी लागली ती कंपनी बघून मला लगेच कुमार ची आठवण आली कारण माळशेज घाटच्या दरम्यान असलेला कुमार हा ह्या दौऱ्या दरम्यान त्याच्या काही खाजगी कारणामुळे नव्हता. त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे मागच्या माळशेज च्या दरम्यान गाडीत जाम बडाया मारत होता, वाटेत दिसेल ती कंपनी म्हण्याचा ही माझी कंपनी आहे, ती माझी कंपनी आहे.. आणि गाडीत बसलेले माझे हे सर्व डायरेक्टर व पर्सनल असिस्टंट आहेत. माळशेज च्या भेटीतून परत येताना तो काय शांत राहत नव्हता, त्याची बडबड त्याने चालूच ठेवलेली त्यातीलच बऱ्याच आठवणी ह्या ट्रीप दरम्यान जागृत होत होत्या. शेवटी आठवणी काय येतंच असतात. थोड्याच काही वेळात आम्ही निसर्गाच्या सनिध्यातून मार्ग काढत असताना वाटेत आम्हाला कुत्र्यांचं पिल्लू दिसलं त्याला काय झालेलं काय माहिती, तो वाटेच्या मधूनच चालत होता खूप काही अंतर तो मधूनच पार करत होता आम्ही शेवटी गाडीतंच म्हटलं की ह्याला आपण उचलून बाजूला करू नाहीतर हा कोणत्या ना कोणत्या गाडीच्या चाकाखाली तरी नक्की येईन म्हणून लगेच शानू गाडीतून उतरला आणि त्याला स्त्यालगतच्या असणाऱ्या कुंपणाच्या पाठीमागे ठेवले. जेणेकरून कुठच्या गाडीच्या फटाक्यामुळे त्याला कसली इजा न होवो. थोड्या काहीवेळातच आम्हाला पाली नाका लागला तिथे उतरून आम्ही मस्त गरमागरम भजी व अजून काही पदार्थ खाऊन पोटाची थोडक्यात असलेली भूक शांत केली व तेथून थोड्या वेळाने निघाल्यानंतर आम्हाला कोलाड नाका लागला तेथून डाव्या बाजूला वळल्यानंतर थोड्याकाही वेळाने आम्हाला ताम्हिणी चा घाटमार्ग सुरू झाला व स्वर्गाची अनुभूती मिळण्यास सुरुवात झाली. मित्रांनो निसर्गाची किमया ही शब्दात न मांडणारी आहे. कारण जे काही सुख आपल्याला निसर्ग देऊ शकतो हे आपल्याला त्याच्या सानिध्यात गेल्यावरच कळतं हे मात्र नक्की. थोडं काही अंतर पार केल्यानंतर वाटेत थोडं थांबून आम्ही परत पुढच्या प्रवासास सुरुवात केली पुढे निघताच गाडीच्या बाहेर येऊन निसर्गाच्या सानिध्यात हवा घेण्याचा क्षण हा फार अविस्मरणीय राहील. समोरून दिसणारा सुंदर रस्ता, डोंगरदऱ्या, वाटेत अधून मधून दिसणारे धबधबे व निसर्गाची आवड असलेले मित्र मंडळी. आयुष्याचे असे अनमोल क्षण जगताना अजून काय पाहिजे आयुष्यात. पण ह्या सर्व मस्ती मध्ये ठरलेल्या नियोजनानुसार वेळ चुकली गेली आमचं पाहिलं देवकुंड वॉटरफॉल साठी जायचं ठरलं होतं नंतर ताम्हिणी घाट. पण ह्या वेळेला उलटं झालं. पाहिलं ताम्हिणी घाट आणि नंतर मग देवकुंड. तिथे वाटेत मिळालेल्या पर्यटकांना आम्ही विचारलं की देवकुंडला जाण्यासाठी कोणता रस्ता आहे.. ते म्हणाले टाटा पॉवरच्या येथे तुम्हाला जावा लागेल. भिरा म्हणून तेथील ठिकाणाचं नाव आहे. ३० किमी पाठीमागे परत जावा. हे ऐकून आम्हाला थोडं नाराजी सारखं वाटू लागलेलं आणि नेटवर्क पण गेलेलं, त्यामुळे गाडीमध्ये गाणी पण वाजत नव्हती शांततेत आम्हाला देवकुंडच्या येथे यावं लागलं पण हे एक जरा चांगलं करून ठेवलेलं की माझ्या एका नात्यामधल्या भावाचा सख्खा चुलत भाऊ 'पाटनुस' या गावा मधील स्थानिक रहिवासी आहे. त्याच्या साहाय्याने आम्हाला मार्ग सोयीस्कर झाला. त्याचं नाव शुभम सावंत, ह्या माझ्या भावाने आम्हाला फार व्यवस्थित मार्गदर्शन केलं तिकडे रस्ता मार्गदर्शक पासून ते अगदी समूह नोंदणी पर्यंत. आमच्या समूहाचा नंबर आम्हाला दिलेला ११९, म्हणजे ह्या दौरा दरम्यान काहीही समस्या आल्या तर एकच असायचं टीम नंबर ११९. म्हणजे स्थानिक गावातील दिशादर्शक व्यक्ती किंवा तिकडचे माणसांना बचाव कार्य करणाऱ्यांना सुद्धा हे सहज पडत असे. आम्ही गाडी पार्क केल्यानंतर देवकुंडच्या दिशेला प्रवास सुरुवात केल्यानंतर वाटेतच पुढे अगदी भिरा धरण मन मोहवून घेत होता निसर्गाच्या सानिध्यातून जाण्याचा मार्ग म्हणजे हा खरोखरच चैतन्यमय वातावरण निर्माण करत असतो. वाटेत आम्हाला छोटे छोटे वॉटरफॉल्स व नदी ह्याचा सामना पार करूनच पुढच्या दिशेला निघून जावं लागत होतं त्यामुळे अजून भारी मज्जा येत होती. एक मेकांच्या साहाय्याने आम्ही शेवटी व्यवस्थित देवकुंड च्या येथे पोहोचलो आणि मनाला एक सुखद आनंद मिळाला कधी त्या पाण्यात पूर्णपणे जाऊन स्वतःला भिजवून घेतोय असं झालेलं आणि शेवटी थोडक्यात आम्ही स्वतःचे फोटो वैगरे काढून घेतल्यानंतर आम्ही पाण्यात गेलो. फार थंड आणि अंगात थंडी भरवणारं पाणी होतं सर्व पाण्यात गेल्यानंतर एकमेकांचे हात आम्ही घट्ट पकडुन ठेवलेले कारण पाण्याच्या प्रवाहाने कोण कुठे जायला नको त्याकरिता. मनाची शांती होत नाही तिथपर्यंत आम्ही देवकुंडच्या पाण्यात होतो नंतर थोड्या वेळात सोनलच्या पायात Cramp आलेला त्यामुळे ती थोडी पाण्याच्या बाहेर गेलेली, थोड्या वेळात आम्ही परतीच्या मार्गावर असताना तिथे एक उंच आणि बारीक धबधबा दिसला आणि मग शानू आणि मी कसला ऐकतोय. गेलो आम्ही त्या धबधब्याच्या खाली. अक्षरशः कानाच्या पाकळ्यांना काहीतरी तोचतय असं वाटतं होतं पण मनाला एकदम जबरदस्त वाटत होतं ५-१० मिनिटं तिथे वेळ घालवल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली आणि शेवटी पटापट गाडीच्या येथे येऊन आम्ही कपडे बदलून टाकले, कारण ओल्या कपड्यावर आम्हाला राहणे पसंत नव्हते. एक मानसिक समाधान मिळाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासास सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी एकदम अफाट मज्जा आली पुढे निघाल्यानंतर कोलाडला आल्यावर एका हॉटेल मध्ये जेवण करून घेतले. हॉटेल मध्ये मित्रांसोबत बसण्याची मज्जा पण आहे ना वेगळीच आहे. समोर असणारा मुंबई गोवा महामार्ग, बाजूलाच निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि अगदी खुल्या मनाने बहरणारा पाऊस आणि अशा स्थिती मध्ये चालू असणाऱ्या गप्पा गोष्टी. ह्यामुळे मनाला एक सुखद आनंद मिळतो आणि मन अजून प्रफुल्लित होते. आम्ही मुंबईच्या मार्गाने निघताच संध्याकाळची रात्र होत होती आणि तो जो क्षण होता तो फार अफाट होता सोनल गाडी मध्ये बोलली सुद्धा की असं वातावरण फार जबरदस्त आहे. गाडीमध्ये येताना सर्व झोपत होते एकटा बिचारा शुभम तेवढी ड्राईव्ह करत होता पण त्याला गाडी चालवताना झपकी येऊ नये म्हणून स्प्राईट गाडी मध्ये ठेवलेलं व गाणी वाजवतच मुंबईला आलो मुंबईला आल्यानंतर अंधेरी-जोगेश्वरी जसे लागले तेव्हा असं वाटतं होतं की उगाच मुंबईला आलो आणि मालाडला आल्यावर तर वाटतंच होतं की का म्हणून परत आलो. पण हा प्रवास एकंदरीत छान झाला.. शुभम, शानू, सोनल, उत्तम आणि अजून २ मित्रांचं सहकार्य होतं म्हणून हा प्रवास अगदी जबरदस्त गेला. पुढे आत्ता पुढच्या ट्रीपला जायचं आहे एवढं मात्र नक्की व पुढच्या वेळेला सुद्धा अशीच मौज मजा चालू ठेऊ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा