मंगळवार, ७ जून, २०२२

फोर्ट रायडर्स - एक वेगळीच गिरीप्रेमींची असलेली माया

 


आयुष्यात गिर्यारोहण असा भाग बनून गेलाय कि जिथे गेल्याशिवाय मन तृप्त होत नाही. कारण एक निसर्गाशी वेगळंच नातं तयार झालं आहे. यंदाचा उन्हाळा तर फार चटके देत होतं त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गिर्यारोहणासाठी कुठेही जायायला जमले नाही पण जून महिना लागला आणि गिर्यारोहणाची उत्सुकता वाढू लागलेली पण सध्याची वेळ अशी आहे की सतत काहीना काही काम असल्यामुळे ह्या सर्वाला वेळ द्यायला वेळ राहतंच नाही.

गूगल वर सर्च केलं Places to visit nearby Lonavla आणि अचानक मन झालं लोणावळा, मळवली येथे असलेल्या विसापूर किल्ल्यावर जायचं पण वेळेचं आणि कसलंच व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे रात्री असलेली शेवटची ट्रेन आमची चुकली आणि आत्ता दुसरं काय पर्याय नव्हतं. लगेच डोक्यात आलं की कल्पेशला संपर्क करूयात कारण तो व गिर्यारोहण समूह महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ओळखला जाणारा म्हणजेच कळसुबाई शिखर येथे निघत होते सर्व समूह कल्याणपर्यंत पोहोचलेलं, मी पण ठरवले आत्ता एकाच पर्याय आहे की कळसुबाईला निघूयात. लगेच मी जयेशला संपर्क केला. जयेशने एका शब्दावर मात्र कसारा येथे मध्यरात्री 03:40 ला गाडीची व्यवस्था केली हे माझ्यासाठी खुप खुप महत्वाचं होतं आणि जयेशने खरोखरचं अश्या वेळेला सहकार्याचा हात पुढे केला हे कौतुकास्पद आहे. साधारण 5:30 ला आम्ही बारी या गावात पोहोचलो, थोड्याश्या विश्रांती नंतर आम्ही पुढे चढाई करायला सुरुवात केली. निसर्गाचा आनंद तर होताच पण सर्वात जास्त आनंद होता तो म्हणजे गिर्यारोहण समूहातील मंडळी आज 2-3 वर्षाने तरी भेटणार आणि 09:25 च्या आसपास पहिलं दर्शन मिळालं ते म्हणजे आमच्या मयूर दादाचं... मयूर दादा म्हणजे समूहातील एक मितभाषी, सर्वांचा लाडका, सर्वांना सहकार्य करणारा, गिरीप्रेमी आणि मैत्री जपणारा एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. मयूर दादा भेटताच त्याच्याकडून आपुलकीचे शब्द तर मिळत होतेच पण त्यासोबत त्याने माझ्या काळजीसाठी हातात एक इलेक्ट्रलचं पॅकेट ठेवलं आणि खाली झालेल्या पाण्याच्या बाटली मध्ये त्याच्या कडे असलेलं पाणी सुध्दा भरून दिलं. हे सर्व बघितल्यावर असं वाटतं की आयुष्यात काय नको पण जीवला जीवपण देणारी माणसं आहेत आपल्याकडे हीच आपली खरी संपत्ती आणि ती ही अगदी बरोबर आहे. मयूर दादा भेटताच सर्व एक एक जुने ट्रेकर्स मंडळी भेटू लागले, सर्वांची आत्ता नावं घेईन तितके कमी राहतील. जयेश (जया) आणि प्राजु सुध्दा भेटले. दोघेही खुप सहकार्य करणारे आहेत. कल्पेशने सुध्दा फोर्ट रायडर्स समुहाचा ठसा माझ्या छातीवर लावला आणि मला ह्यात अभिमान वाटू लागले. सममूहातील सर्व गिरीप्रेमी तर नक्कीच आहेत शिवाय आपल्यामुळे निसर्गाला काय हानी होणार नाही याची तंतोतंत काळजी घेत असतात. सर्व गिरीप्रेमींचे चेहरे समोर येणं म्हणजे हे सर्व शब्दात व्यक्त न होण्यासारखं आहे हे मला आत्ता अगदी जाणवतंय कारण तेवढीच नाळ गिरीप्रेमी सवंगड्यांसोबत जुळलेली असते. पाठमोरी फिरताना जयेशने मात्र विचारलं जेवणाचं कसं तुझ्या? खाली सांगून ठेवलं आहेस का? नसेल सांगितलंस तर सांगून ठेवतो.. हे जे आपुलकीचे शब्द असतात ना तेच आयुष्यात उमंग देत राहत असतात.

 

धन्यवाद..

पुन्हा नक्कीच भेटू..



निसर्गाच्या सानिध्यात रमताना मिळालेला आनंद आपण निसर्गातच मिळवू शकतो. 



मेघांचा वर्षाव आणि सूर्यकिरणे 









मयूर दादासोबत, मी, रोशन रक्षे, प्रणव व मित्रपरिवार 


बऱ्याच वर्षाने भेटलेला एक परिवार 
डावीकडून - प्रणाली, जयेश, प्रथमेश, मी, कल्पेश व प्राजक्ता 










 
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा